ajun tari rul sodun अजुन तरी रूळ सोडुन

अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा

आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पूर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्यांचे नूर
अजुन तरी पर्वा ना शम्मे पासुन दूर
मैत्रीणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ऒठांचे ऩाजुक अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुनी पाजीले कुणी
मैघान्याचे स्मरले आम्हा ………. मंदीर मज्जीद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा

कधी गोडीने गाउन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातवरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment