shur amhi sardar amhala kay kunachi bhiti शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत

तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीती.

लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं

लढून मरावं मारून जगावं हेच आम्हाला ठावं.

देशापायी सारी विसरू माया ममता नाती.

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!!

 

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment