he bhalate avghad asate हे भलते अवघड असते

गाडी सुटली रुमाल हलले
गाडी सुटली रुमाल हलले
क्षणात डोळे टचकन ओले

गाडी सुटली पडले चेहेरे
क्षण साधाया हसरे झाले

गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना
गाडी सुटली हातामधूनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटुदे म्हटले तरी तुटेना

कारे इतका लळा लावूनी नंतर मग ही गाडी सुटते?
कारे इतका लळा लावूनी नंतर मग ही गाडी सुटते?
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते

गाडी गेली
फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला
गाडी गेली
फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला

गाडी गेली
डोळ्यांमधल्या निर्धारांचा पारा फुटला
गाडी गेली
डोळ्यांमधल्या निर्धारांचा पारा फुटला

हे भलते अवघड असते…
हे भलते अवघड असते…
कुणी प्रचंड आवडणारे…
ते दूर दूर जाताना…
डोळ्यांदेखत आणि
नाहीसे लांब होताना..
कुणी प्रचंड आवडणारे…
ते दूर दूर जाताना…
डोळ्यांदेखत आणि
नाहीसे लांब होताना..

डोळ्यांतील अडवून पाणी
हुंदका रोखुनी कंठी
डोळ्यांतील अडवून पाणी
हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता
तुम्ही केविलवाणे हसता
अन तुम्हास नियती हसते

हे भलते अवघड असते..हे भलते अवघड असते..

तरी असतो बघणऱ्याचा
हातात रुमाल गुलाबी
वाऱ्यावर फडकवताना
पायची चालती गाडी

ती खिडकीतून बघणारी
अन स्वत:मधे रमलेली
ती खिडकीतून बघणारी
अन स्वत:मधे रमलेली
गजरा माळावा इतके
ती सहज अल्विदा म्हणते

हे भलते अवघड असते..हे भलते अवघड असते

तुम्ही म्हणता मनास आता
हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणते ती माझ्या
कधी गावा येशील का तू?
तुम्ही म्हणता मनास आता
हा तोडायाचा सेतू
इतक्यात म्हणते ती माझ्या
कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते
मग सहजच हळवी होते
ती सहजच म्हणुनी जाते
मग सहजच हळवी होते
गजऱ्यातील दोन कळ्या अन
हलकेच ओंजळीत देते

हे भलते अवघड असते..हे भलते अवघड असते

कळते की गेली वेळ
ना आता सुटणे गाठ
आपल्याच मनातील स्वप्ने
घेऊन मिटावी मूठ

ही मूठ उघडण्यापूर्वी
ही मूठ उघडण्यापूर्वी
चल निघुया पाऊल म्हणते
पण पाऊल निघण्यापूर्वी
पण पाऊल निघण्यापूर्वी
गाडीच अचानक निघते

हे भलते अवघड असते.. हे भलते अवघड असते

परतीच्या वाटेवरती
गुदमरुन जड पायांनी
ओठावर शीळ दिवाणी
बेफिकीर, पण थरथरती
पण क्षण क्षण वाढत असते
अंतर हे तुमच्या मधले
पण क्षण क्षण वाढत असते
अंतर हे तुमच्या मधले

मित्रांशी हसतानाही
मित्रांशी हसतानाही
ते दु:ख चरचरत असते

हे भलते अवघड असते
हे भलते अवघड असते

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment