damalelya babachi kahani दमलेल्या बाबाची कहाणी

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परी राणी,

उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी (२)

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत

निजतंच तरी पण येशील खुशीत

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

आट-पाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा करी लोकलची वारी (२)

रोज सकाळीस राजा निघताना बोले

गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परी येणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी

खऱ्याखुऱ्या पारीसाठी गोष्टीतली परी

बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

ऑफिसात उशिरा मी असतो बसून (२)

भंडावले डोके गेले कामात बुडून (२)

तास–तास जातो खाल मानेने निघून (२)

एक-एक दिवा जातो हळूच विझून (२)

अशावेळी काय सांगू काय काय वाटे (२)

आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे (२)

वाटते कि उठुनिया तुझ्या पास यावे (२)

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे

उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी (२)

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही

बघताना भान मला उरणार नाही (२)

हसूनिया उगाचच ओरडेल काही

दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

 दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई (२)

मउ-मउ दुध भात भरवेल आई (२)

गोष्ट ऐकायला मग येशील न अशी (२)

सावरीच्या उशीहून मउ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही

जेऊ, खाऊ, न्हाऊ, माखू घालतो ना तुला

आई परी वेणी फणी करतो ना तुलाऽऽऽऽऽऽऽऽऽ

जेऊ, माखू न्हाऊ, खाऊ घालतो न तुला

आई परी वेणी-फणी करतो ना तुला

तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा

तो हि कधी गुपचूप रडतो रे बाळा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची या कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)

 बोल्क्यामध्ये लुक-लुक्लेला तुझा पहिला दात (२)

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मउ भात

आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा (२)

रांगत-रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा (२)

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाउल पहिलं (२)

दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून (२)

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशिराला येतो

बालपण गेले तुझे गुज निसटून

उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून

जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे

नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं (२)

सासुर्याला जाता-जाता उंबरठ्या मध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये….

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

Posted in Uncategorized | Leave a comment

abhalmaya आभाळमाया

जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया……
आभाळमाया…….

Posted in Uncategorized | Leave a comment

dis jatil , dis yetil दिस जातील, दिस येतील

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो
आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल
तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल

उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
Posted in Uncategorized | Leave a comment

aata vajle ki bara आता वाजले की बारा

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
स्वर – बेला शेंडे
चित्रपट – नटरंग (२०१०)

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माईना
कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटु कवातरी साजणा …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची

(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची)

शेत आलं राखनीला राघु झालं गोळा
शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना

(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)

मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या …
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

कशा पाई छळता, मागं मागं फिरता
असं काय कर्ता, दाजी हिला-
भेटा की येत्या बाजारी
सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली
आता बाराची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा.

 

Posted in Uncategorized | Leave a comment

morya morya मोरया मोरया!

चित्रपट – उलाढाल
दिग्दर्शक – विश्वास सरपोतदार
कलाकार – भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, मधुरा वेलणकर, आदिती सारंगधर वगैरे.
संगीत – अजय – अतुल

देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया

मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

ओंकाराच रुप तुझ चराचरा मंदी
झाड येली पाना संगी फुल तु सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली

हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

आदी अंत तुच खरा तुच बुध्दी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाज दश दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा

हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वराबा तु घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

Posted in Uncategorized | Leave a comment

dete kon dete kon

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देते कोण देते कोण देते कोण देते ?

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देते कोण देते कोण देते कोण देते ?

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि अळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देते कोण देते कोण देते कोण देते ?

आभाळीच्या चंद्रामुळे रात होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
भुईतून येतो तरी नितळ हा झरा
चिखलात उगवून तांदूळ पांढरा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

मुठभर बुल्बुल, हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे का रे दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देते कोण देते कोण देते कोण देते ?

भिजे माती आणि तरी अत्‍तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर पुढे दहा फाटे
देते कोण देते कोण देते कोण देते ?

 

Posted in Uncategorized | Leave a comment

avantika अवंतिका

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे
जीवनाशी ती कधीची भांडते आहे
दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती
वेगळे काहीतरी बघ सांगते आहे
जीवनाचे एक गाणे गात जाताना
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

उगवले आहे इथे हे झाड पाण्याचे
आसवांना तीच वेडी सांडते आहे
जीवनासाठी जणू ही अकस्मिता
सूख आणिक दु:ख वेडी अवंतिका

गीत सौमित्र
संगीत नरेंद्र भिडे
स्वर विभावरी आपटे
Posted in Uncategorized | Leave a comment

Nako devraya ant asa pahoo / नको देवराया, अंत असा पाहू

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे

हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
Posted in Uncategorized | Leave a comment

Are sansar sansar

अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर

अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला, लोटा कधी म्हणू नये

अरे संसार संसार, नाही रडणं, कुढणं
येडया गळयातला हार, म्हणू नको रे लोढणं

अरे संसार संसार, दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार, आणि दुखाःला होकार

Posted in Uncategorized | Leave a comment

Tu sukhakarta / तू सुखकर्ता, तू दुःखकर्ता, तूच कर्ता आणि करविता

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता

देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य कळावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा
Posted in Uncategorized | Leave a comment